महाराष्ट्राची संस्कृती जपून छत्रपती शिवाजी महाराज यांची प्रतिमा देऊन विदेशी शिक्षकांचा केला सत्कार .

पर्यावरण संवर्धन व शैक्षणिक उपक्रमांचे आंतरराष्ट्रीय कार्यक्रमात केले सादरीकरण.

महाराष्ट्राची संस्कृती जपून छत्रपती शिवाजी महाराज यांची प्रतिमा देऊन विदेशी शिक्षकांचा केला सत्कार. 

उत्तम ब्राम्हणवाडे.


दिल्ली येथे 28 ऑक्टो ते 3 नोव्हें या दरम्यान RELTTAW या प्रकल्प अंतर्गत ग्लोबल एक्स्चेंज प्रोग्रॅम व विविध कार्यक्रम चे आयोजन केले गेले होते ज्यात जगातील 4 खंड व 15 देशातील प्रतिनिधी शिक्षक व रिसर्चर सहभागी झाले होते.

त्या अंतर्गत 31 ऑक्टो रोजी ग्लोबल एक्सचेंज प्रोग्रॅम अंतर्गत विविध देशातील प्रतिनिधीचे पर्यावरण संवर्धन विषयक सादरीकरण व आंतरराष्ट्रीय पुरस्कार वितरण कार्यक्रम हा कार्यक्रम डि .एम .ई (दिल्ली मेट्रोपोलिटन एज्युकेशन) नोयडा 62 दिल्ली येथे पार पडला. येथे विविध देशातील शिक्षक व संशोधक यांनी शैक्षणिक व पर्यावरण विषयावर सादरीकरण केले.या कार्यक्रमाला


भारतातील मोजक्या 18 शिक्षकांना आमंत्रित करण्यात आले होते. अंकुश गावंडे सहायक शिक्षक जि प शाळा ,दाभा यांना आमंत्रित केले होते. त्यांनी शैक्षणिक व पर्यावरण विषयक उपक्रमांचे या आंतराष्ट्रीय कार्यक्रमात उत्कृष्ट असे सादरीकरण केले.त्यांना या ठिकाणी ग्लोबल सस्टेनेबिलिटी रिसर्चर अवार्ड हा आंतरराष्ट्रीय पुरस्कार

देऊन सन्मानित करण्यात आले.पर्यावरण संवर्धन व
विविध शैक्षणिक उपक्रम करिता त्यांनी आंतरराष्ट्रीय वर्ल्ड वाईड ग्रीन प्रोजेक्ट सुरु केला ज्यात सध्या 45 देशातील शिक्षक व विद्यार्थी सहभागी आहेत. त्यांनी सुरु केलेल्या वर्ल्ड वाईड ग्रीन प्रोजेक्ट या प्रकल्पामध्ये


सहभागी त्यांच्या सहकारी व RELLTAW च्या संस्थापक रोमानिया येथील कोरिना सुजादा यांना त्यांनी महाराष्ट्राची संस्कृती जपून छत्रपती शिवाजी महाराज यांची प्रतिमा, तसेच शाल ,श्रीफळ देऊन प्रकल्पात
अतिशय उत्कृष्ट कार्य व सहकार्य केल्या बद्दल भारतीय पद्धतीने सत्कार केला.तसेच मलेशिया या देशातील प्रकल्प समन्वयक व प्रकल्पात अतिशय उत्कृष्ट कार्य केल्याबद्दल डॉ.मालिनी इगनाथन यांना व सोमालीलँड


या देशातील प्रकल्प समन्वयक साद यांना सुद्धा शाल ,श्रीफळ देऊन सन्मानित केले.या प्रा.उज्वल चौधरी व डॉ.अंबरीश सक्सेना यांनी या कार्यक्रमाचे नियोजन केले होते. या ठिकाणी विविध देशातील सहभागी शिक्षक व संशोधक प्रतिनिधींनी अंकुश गावंडे यांचे व त्यांच्या पर्यावरण व शैक्षणिक उपक्रमाचे कौतुक केले व शुभेच्छा दिल्या.

Comments

Anonymous said…
Thank you so much Bhau

Popular posts from this blog

लाडली बहन योजना के कारण नहीं मिल रहे है मजदूर !

घरोघरी होणार वाघाट्याची भाजी.

ग्रामीण भागात कापूस वेचणीला सुरुवात