आशा वर्कर्सचे तहसील कार्यालयावर निदर्शने!
मुख्यमंत्री, आरोग्यमंत्री तहसीलदार मार्फत सिटू च्या नेतृत्वात दिले निवेदन!!
मनीषा गेडाम, दिपाली कोपरकर, प्रीती जकवार, वंदना महल्ले, नंदा साठे, वैशाली बसवनाथे, रीना शेंडे,वर्षा इंगोले, सुलोचना जैतवार,रंजना जाधव, अरुणा वासनिक, सुजाता कांबळे, शारदा अंबाडरे, कविता
उत्तम ब्राम्हणवाडे.
आशा वर्कर्स संघटना सीटू नांदगांव खंडेश्वर तालुका वतीने आशानी तहसील कार्यालय येथे राज्यव्यापी संपाच्या 15 व्या दिवशी केली निदर्शने!!
महाराष्ट्र राज्य आशा वर्कर्स व गटप्रवर्तक कर्मचारी कृति समितिच्या वतीने प्रलंबित मागण्या साठी 18 ऑक्टोबर पासुन राज्यव्यापी बेमूदत संप सुरु आहे.
आज संपाचा 15 वा दिवस आहे; तरी राज्य सरकार आशा वर्कर्स यांच्या मागण्या मंजूर करण्यास तयार नाही. राज्यातील ग्रामीण भागातील आरोग्य व्यवस्था पुर्णपने कोलमडली आहे. आशा वर्कर्स सर्व आरोग्य केंद्र मधील लसीकरण असो; गर्भवती महिला यांच्या प्रकृति बद्दल असो;अनेक काम करतात तरी शाशनाचे दुर्लक्ष् आहे.
या सर्व धोरणा विरुद्ध आशा वर्कर्स मधे तीव्र असंतोष आहे. सतत लढा कायम राहील ही भूमिका घेऊन निदर्शने करण्यात आली, निवेदन देतेवेळी जिल्हाध्यक्ष सुभाष पांडे, श्याम शिंदे, राजेंद्र भांबोरे, अशोक केसरकर, किशोर शिंदे, आशा वर्कर्स, सुनिता भगत, चैताली कस्तुरे,
Comments