राजकीय नेत्यांना 'मोखड' गावात करण्यात आली गावबंदी.

गावाच्या वेशीवर लावले फलक.

मराठा समाजाला आरक्षण देण्याची मागणी.

मनोज जरांगे पाटलाना दिला पाठींबा.

उत्तम ब्राम्हणवाडे.


 नांदगाव खंडेश्वर तालुक्यातील मोखड गाव हे आमदार 'खासदार 'नेत्यांना गावात प्रवेश बंदी करणारे तालुक्यातील 1 ले गाव ठरले आहे.गावातील मराठा बांधव यांनी याबाबत भूमिका घेत गावात पुढार्‍यांना गावाच्या मुख्य द्वारावर मराठा आंदोलनाचे फलक लावून गाव बंदी केल्याचे दिसत

आहे.तसेच मराठा समाज आक्रमक झाल्याचे पाहायला मिळत आहे. मराठा समाजाला सरसकट आरक्षण मिळावे या मागणीसाठी मनोज जरांगे पाटील यांनी उभारलेल्या लढ्याला मराठा समाजाकडून मोठा पाठिंबा मिळत आहे. नांदगाव खंडेश्वर तालुक्यामध्ये ही मराठा


आरक्षणासाठी समाज आक्रमक होताना दिसून येत आहे. गावामध्ये नेत्यांना गावबंदी केल्याचे फलक झळकले असून,आमदार,खासदार,नेते व पुढारी यांना गाव बंदी करण्यात आली आहे. विनाकारण आमच्या गावात येऊन अपमान करून घेऊ नये, असे फलक


लावण्यात आले. मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर विविध राजकीय नेत्यांच्या दुटप्पी भूमिकेमुळे समाजात तीव्र भावना आहेत. मोखड गावाच्या प्रवेशद्वारावर फलक लावून सोशल मीडियाच्या माध्यमातून युवकांनी नेत्यांना गावबंदी केल्याने व आक्रमक भूमिका घेतल्याने


आरक्षणाचे आंदोलन पुन्हा एकदा चर्चेत आले आहे. गाव बंदीच्या फलकामुळे लोकप्रतिनिधीची कोंडी होणार आहे. गाव जोपर्यंत आरक्षण मिळत नाही, तोपर्यंत


गावात नेत्यांना प्रवेश न देण्याचा निर्णय येथील मराठा आंदोलकांनी घेतला आहे.

Comments

Popular posts from this blog

लाडली बहन योजना के कारण नहीं मिल रहे है मजदूर !

घरोघरी होणार वाघाट्याची भाजी.

ग्रामीण भागात कापूस वेचणीला सुरुवात