फुबगावं येथील शेतकऱ्याने केली यशस्वी पपईची शेती.
आठ महिन्यात काढले लाखोचे उत्पादन.
पिकाला दिवसा लाईट देण्याची मागणी.
उत्तम ब्राम्हणवाडे.
शेतकरी व शेती ही नेहमीची समस्या सर्वांच्या परिचयाची आहे भारत हा कृषिप्रधान देश असून शेतकरी हा जगाचा पोशिंदा आहे असे आपण म्हणतो परंतु सध्या शेतकरी हा समस्याच्या विळख्यात अटकला असून कधी जास्त पाऊस आला तर पीक हातच जाते किंवा कमी पाऊस आला तर उत्पादनात घट होते.
तर कधी कपाशी पिकावर लाल्या पडल्याचे दृश्य आहे या मधून कदाचित वाचलं तर वन्यप्राणी यांनी केलेले नुकसान वेगळे ही नित्याची बाब आहे. दुसरं पीक जस गहू. चणा पेरणी करायच म्हटल तर त्याला पाणी द्यावं लागते रात्रीचि लाईट असल्याने अर्ध्या रात्री अंधारात
शासनाने शेतकऱ्यांना जर दिवसा मोटरपम्पा करिता विद्युत लाईन दिली तर आपण या पेक्षाही जास्त उत्पादन घेऊ शकतो. शेतकरी हा रात्रभर जागून शेतात ओलीत करतो जर विद्युत विभागाने दिवसा लाईट दिली दिली तर शेतकऱ्यांची मोठ्या प्रमाणात सोय होईल. याकडे शासनाने लक्ष द्यावे.
भैय्या धवस.
(शेतकरी)
फुबगाव,ता.नांदगाव खंडेश्वर.
Comments