विद्यार्थ्यांना विद्यापीठाची सर्व प्रमाणपत्रे ऑनलाईन पद्धतीने देण्यात यावी.
डॉ. नितीन टाले यांचा सिनेटमध्ये प्रस्ताव.
उत्तम ब्राम्हणवाडे.
संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठ अंतर्गत शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना विद्यापीठाशी संबंधित सर्व प्रकारची प्रमाणपत्रे देणे तसेच आवेदन पत्र भरण्याची काम ऑनलाइन पद्धतीने करण्यात यावे असा ठराव सिनेट सभागृहामध्ये मंजूर करण्यात आला अति सभा सदस्य डॉ. नितीन टाले यांनी हा ठराव मांडला.
संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठ परिक्षेत्रात एकूण ५ जिल्ह्यांतील ५६ तालुक्यांचा समावेश होतो. विद्यापीठापासून जवळपास अडीचशे किलोमीटर पर्यंतचे विद्यार्थी विद्यापीठांतर्गत शिक्षण घेतात. या सर्व विद्यार्थ्यांना विद्यापीठाशी संबंधित पदवी प्रमाणपत्र, गुणपत्रिका, दुय्यम गुणपत्रिका, स्थलांतर प्रमाणपत्र असे विविध प्रमाणपत्रे व आवेदन पत्रे भरण्याकरिता अमरावतीला विद्यापीठामध्ये यावे लागते.
माहिती तंत्रज्ञानाच्या जगात आज शासनाच्या सर्व विभागांचे कामकाज ऑनलाइन पद्धतीने चालत असताना विद्यापीठाने सुद्धा पूर्णपणे ऑनलाईन प्रक्रियेचा अवलंब केल्यास विद्यार्थ्यांकरता ते अतिशय सोयीचे होईल.
त्यामुळे विद्यापीठाच्या प्रशासकीय कामकाजाचे पूर्णतः डिजिटलायझेशन करून विद्यार्थ्यांच्या संबंधित सर्व प्रमाणपत्रे ऑनलाईन पद्धतीने देण्यात यावे असा ठराव डॉ नितीन टाले यांनी सिनेट सभेमध्ये मांडला हा ठराव बहुमताने मंजूर करण्यात आला.
या निर्णयामुळे विद्यापीठ प्रशासकीय कामकाजासंबंधी विद्यार्थ्यांना होणारा त्रास व खर्च कमी होईल. विद्यार्थी हिताच्या या निर्णयाचे विविध विद्यार्थी संघटनांनी स्वागत केले आहे.
Comments