बेमुदत राज्यव्यापी संपाचा १५ वा दिवस.
तहसिलदार यांना दिले निवेदन.
उत्तम ब्राम्हणवाडे.
आयटक संलग्न महाराष्ट्र राज्य आरोग्य खाते आशा व गट प्रवर्तक संघटना व आशा व गटप्रवर्तक कृती समितीच्या नेतृत्वाखाली दिंनाक १८/१०/२०२३ पासुन आशा व गटप्रवर्तकांच्या न्याय मागण्यासाठी राज्य व्यापी संप सुरू आहे, राज्यव्यापी बेमुदत संपात राज्यातील ७०००० आशा व ४००० हजार गटप्रवर्तक सह
जिल्हातील २३०० वर आशा व गटप्रवर्तक संपात सहभागी झाल्या आहेत. आशा स्वंयसेविकांना मोबदल्या केंद्र सरकारने भरिव वाढ करावी,किमान वेतन लागू करावे , आँनलाईन कामे लादने बंद करा.दिवाळी बोनस जाहीर करा.व गटप्रवर्तकांना शासकीय सेवेत समायोजन करा तेव्हा पर्यंत कंत्राटी कर्मचारी प्रमाणे वेतनश्रेणी लागू
करा या प्रमुख मागणीसाठी गेली १४ दिवसांपासून आशा व गटप्रवर्तक राज्य व्यापी संपात सहभागी झाल्या आहेत पंरतु राज्य सरकारने अध्यापही मागण्यांची दखल घेतली नाही आशा व गटप्रवर्तकांच्या मागण्यासाठी राज्य सरकारने दखल न घेतल्यामुळे जिल्हातील प्रत्येक तालुक्यातील तहसील कार्यालयावर धरणे आंदोलनाची जिल्हा संघटनेच्या वतीने तहसिल कार्यालयावर धरणे
आंदोलनाची हाक देण्यात आली होती त्याचाच भाग म्हणून आज दिनांक १/११/२०२३ रोजी, नांदगाव खंडेश्वर तहसील कार्यालयावर आयटक आशा व गटप्रवर्तक संघटनेच्या नेतृत्वाखाली भव्य धरणे आंदोलनात सुरू आहे , राज्य सरकारने आंदोलनाची दखल घेऊन आशा व गटप्रवर्तकांच्या न्याय मागण्या त्वरित निकाली काढण्यात याव्या अन्यथा आंदोलन तिव्र आंदोलन छेडण्याची भावना आंदोलनात उपस्थित झालेल्या आशा व गटप्रवर्तक भगिनींनी व्यक्त केली आंदोलनात केंद्रातील मोदी सरकार व राज्यातील शिंदे व फडणवीस विरोधात घोषणाबाजी करत मागण्या त्वरित निकाली काढण्याची मागणी केली . यावेळी आंदोलनात स्थळी संघटनेचे जिल्हा सचिव यांनी भेट देत केंद्र व राज्य सरकार टिका करत आशा व गटप्रवर्तकांच्या न्याय मागण्या त्वरित निकाली न काढल्यास दिवाळी च्या दिवशी जिल्हातील सर्व आशा व गटप्रवर्तक जेल भरो आंदोलन करतील असा इशारा ही यावेळी देण्यात आला.
यावेळी कामगारांचे नेते काॅ. तुकाराम भस्मे यांनी आंदोलनाला भेट मार्गदर्शन केले .यावेळी तालुका अध्यक्ष आशा गायगोले पाटील, तालुका सचिव कांता इंगोले , संगिता भस्मे, जयश्री ठवकर ,अमिता
मेश्राम,शालिनी मारोटकर , ज्योत्स्ना राऊत , वंदना चकरे , रमा बनसोड ,वनिता भाकरे ,मंगला बोबडे, माया वाडेकर ,नलिनी हत्तीमारे , चित्रा सुर्यवंशी,पद्मा सारवे ,सुलोचना साखरे ,मंगलआइ काळे ,रेणुका बाडे, त्रिवेनी सोनोने, मिना भगत , करुणा मंडवधरे ,वैशाली कापडे ,विना सेजव ,यावेळी मोठ्या संख्येने आशा व गटप्रवर्तक भगिनीं धरणे सहभागी झाल्या होत्या.
Comments