दररोज होतोय दुधाइतका खर्च मोबाईलवर.
प्रत्येक घरांत तीन मोबाईलचा वापर.
कुटुंबाचा आर्थिक भार वाढला.
उत्तम ब्राह्मणवाडे
पूर्वी १०-२० रुपयांत मोबाइलचा रिचार्ज केला जायचा. त्यात महिनाभर मोबाइल चालायचा. रिचार्ज संपला तरी येणारे कॉल सुरू असायचे. पण, सध्या मोबाइल रिचार्जचे दर भरमसाट वाढले आहेत.
सगळ्यांच्या हातात हातात सध्या अॅण्ड्रॉइड मोबाइल असून, त्यात व्हॉट्सअॅप, फेसबुक, ट्विटर असे अॅप असल्याने व इंटरनेटने चालत असल्याने मोबाइलमध्ये डेटापॅकचा रिचार्ज करावा लागतो.
पण, हा डेटापॅक कमीत कमी २५० रुपयांचा राहत असून, तोही फक्त २८ दिवस चालतो. माणसाच्या जीवनातील मोबाइल हा आवश्यक घटक झाला असून, मोबाइलमुळे तत्काळ संपर्क होत असून, घरातील लहान मुले सोडल्यास सगळ्यांच्या हाती मोबाइल दिसतो. कोरोनाकाळात तर मोबाइलवर मुलांचे शिक्षण झाले.
सध्या मोबाइलपेक्षा अॅण्ड्रॉइड मोबाईल घेण्याकडे जास्त कल असतो.आणि याला डेटापॅक ही मोठ्या रकमेचा मारावा लागतो .एकंदरीत नागरिकांचा खर्च दिवसेदिवस वाढताना दिसून येत आहे .त्यामुळे कुटुंबाची आर्थिक घडी विस्कटली आहे .
एक लीटर दूध अन् रिचार्जचा खर्च सारखाच.
प्रत्येक घरात दररोज किमान अर्धा ते एक लीटर दूध लागते. त्याचा दर जवळपास ७० रुपये आहे. आता प्रत्येक घरात तीन-चार मोबाइल असल्याने त्यांचा रिचार्ज खर्चही तेवढाच असल्याचे दिसून येत आहे.
लहान मुलांपासून घरातील सर्वच माणसांकडे मोबाइल असतो. कुटुंब लहान असो वा मोठे, प्रत्येक घरात किमान तीनपेक्षा जास्त मोबाइल आहेत.
शहरासह ग्रामीण भागातही वाढले रिचार्ज सेन्टर.
शहराप्रमाणेच ग्रामीण भागातील नागरिकही मोठ्या प्रमाणात मोबाइल वापरू लागल्याने ग्रामीण भागात मोबाइल रिचार्ज करणारी, मोबाइल विक्री तसेच दुरुस्तीची दुकाने वाढू लागली आहेत. दरम्यान काही घरात एकूण आठ माणसे असून, त्यापैकी पाच जणांकडे मोबाइल आहे. त्याचा महिन्याला रिचार्जचा खर्च तीन हजारांपेक्षा जास्त येतो. जेवढा महिन्याला किराणा लागतो, तेवढ्याचा रिचार्ज मोबाइलमध्ये करावा लागतो.
Comments