युवकांच्या प्रश्नासाठी संघर्ष यात्रेमध्ये सर्वच लोक सहभागी - आ. रोहित पवार
गरिबांच्या मुलासाठी सुरू असलेल्या जिल्हा परिषद शाळा बंद पडू देणार नाही..
उत्तम ब्राम्हणवाडे
महाराष्ट्रभर सुरू असलेल्या युवा नेता आमदार रोहित पवार यांच्या नेतृत्वात संघर्ष यात्रा महाराष्ट्रात चालू असून शेतकरी, युवक, महिला, विद्यार्थी यांचे प्रश्न घेऊन हिवाळी अधिवेशनावर धडकणार आहेत. या संघर्ष यात्रेचे आगमन नांदगाव खंडेश्वर येथे झाले बस स्थानक चौक येथे जाहीर सभा घेण्यात आली सभेला संबोधित करताना आ.रोहित पवार म्हणाले,
युवकांच्या हाताला रोजगार नाही, नोकर भरतीचे प्रमाणाही कमी आहे यासर्व समस्यांना आजचा युवक ग्रासला असून तळागळातील युवकांचे प्रश्न सोडविण्यासाठी पुणे ते नागपूर असा ८०० किमीची युवा संघर्ष यात्रा काढण्यात येत आहे. या संघर्ष यात्रेमध्ये सर्वजाती धर्माचे लोक सहभागी होत असून लवकर युवकांचे प्रश्न शासन दरबारी मांडणार असल्याचे प्रतिपादन आमदार रोहित पवार यांनी शहरात आयोजित संघर्ष यात्रेदरम्यान बोलताना
सभेमध्ये बस स्टॉप चौक येथे केले. या यात्रेला युवकांचा मोठा प्रतिसाद मिळाला.यावेळी पुढे बोलतांना आ. पवार म्हणाले की, युवा संघर्ष यात्रेला नांदगाव खंडेश्वर तालुक्यातील युवकांचा उत्स्फुर्त प्रतिसाद मिळाला असून युवा-च्या मागण्यांसाठी आम्ही सर्व- युवा पुणे ते नागपूर असा ८००
किमीचा पायी प्रवास करतअसून नागरिकांशी संवाद साधत आम्ही आतापर्यंत 6०० किमीचा
टप्पा यशस्वीपणे पार केला.-आहे. आपल्या नजरेत आमचा हा संघर्ष लहान असला तरी ज्या मागण्यांसाठी आम्ही संघर्ष करत आहोत त्या मागण्या अत्यंत महत्वाच्या असून लाखो युवकांचे भविष्याशी निगडित
आहेत आणि याच मागण्यांसाठी
भविष्यात मोठ्या संघर्षाची
देखील आमची तयारी आहे. युवांच्या, सर्व सामान्यांच्या प्रश्नांना घेऊन चाललेल्या युवा संघर्ष यात्रेकडे राजकीय टीकेसाठी का होईना आपले
लक्ष गेलेच आहे तर युवकांचे जे
मुद्दे आम्ही घेऊन चाललो आहोत
त्यांच्याकडेही थोडे लक्ष द्या आपण माझ्यावर काहीही टीका करा, टीका मी पचवून घेईल परंतु युवाच्या मागण्यांकडे दुर्लक्ष केले तर अजिबात खपवून घेणार नाही तुमची कार्यक्षमता आणि तळमळ महाराष्ट्राने या आधीही पाहिली आहे, अश्या मीश्कील भाषेत अनेकांचा समाचार घेतला. आमदार रोहित पवार पुढे बोलतांना म्हणाले शेतकऱ्यांना पीक विमा भेटला नाही अवकाळी पावसाचे पंचनामे करण्यात आले नाही शेतीला पुरेसा विज पुरवठा नाही हे सर्व प्रश्न हिवाळी अधिवेशनात उपस्थित करणार
त्यानी यात्रेला संबोधित केले, संघर्ष यात्रेत सहभागी रोहित आर पाटील यांनी सुद्धा संबोधित केले.मंचावर महाविकास आघाडीचे नेते माजी प्रा.आमदार वीरेंद्र जगताप, माजी खासदार अनंत गुढें, सुधीर सूर्यवंशी, बाळासाहेब भागवत, बाळासाहेब राणे, गणेश रॉय, सुरेश कहाते, अमजद खान, हेमंत देशमुख, सिद्धेश्वर चव्हाण, अक्षय पारस्कर, निशांत जाधव,अमोल धवसे,विक्रम झाडे,विनोद चौधरी, विष्णुपंत तीरमारे, सीमा जाधव, शोभा लोखंडे,मनोज गावंडे, जयश्री बावणे,रोशन कडू, मो. साजिद, न्याहमद भाई, सल्लूभाई, धनराज रावेरकर, किशोर भेंडे, जितेंद्र घोडे, फिरोज लढाणी, पंकज ठाकरे चंदू बावणे,संदीप ठाकरे,जफर पटेल, अमीर सोहेल, विकी, संदीप ठाकरे यांचेसह शेकडो नागरिक उपस्थित होते.
Comments