पिंपळगांव ( निपाणी) परिसरात वन्य प्राण्यांचा हैदोस !

पिकाचे होत आहे अतोनात नुकसान, वनरक्षकाची गस्त वाढवण्याची शेतकऱ्यांची मागणी.

वन्य प्राण्यांचा बंदोबस्त करण्याची त्रस्त शेतकऱ्यांची मागणी.

नांदगाव खंडेश्वर / उत्तम ब्राम्हणवाडे 

नांदगाव खंडेश्वर तालुक्यातील  मौजे पिंपळगाव (निपाणी),माळेगाव, लोहोगाव या परिसरात रोही, रानडुकरे,हरीण,माकडे या वन्य प्राण्यांचा मोठ्या प्रमाणात हैदोस असून शेती पिकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान करीत आहे.

त्यामुळे  वनविभागाने या वन्य प्राण्यांचा त्वरित बंदोबस्त करावा या मागणीची तक्रार मौजे पिंपळगाव निपाणी,माळेगाव, व लोहोगाव येथील शेतकऱ्यांनी वनविभाग वडाळी परीक्षेत्र अमरावती यांच्या कडे देण्यात आली,पेरणी केल्या नंतर पिक वर यायला लागताच  शंभर ते दीडशेच्या कळपाने रोही (निलगाय), रान डुकरे व हरीण फिरत असल्याने शेती पिकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान होत आहे.

 दिवसरात्र मेहनत करून उभे केलेले पिक डोळ्यादेखत जमीनदोस्त होत आहे,त्यामुळे शेतकरी संकटात सापडला आहे.वन्यप्राण्यांपासून पिकांच्या संरक्षणासाठी शेतकऱ्यांची दमछाक होत असून असह्य त्रास या वन्य प्राण्यांपासून होत आहे. 


परंतु वनविभागाकडून दुर्लक्ष होत असल्याने रात्री पाळी किंवा दिवसापाळी वनकर्मचारी यांची गस्त वाढवण्यात यावी अशी मागणी पिंपळगाव (निपाणी),माळेगाव,व लोहोगाव येथील शेतकऱ्यांनी केली.वनरक्षक व वनकर्मचाऱ्यांची जंगलात सेवा असताना ऑफिस मध्ये बसून असतात व ऑफिस मध्ये बसून पगार घेतात.

असेही या तक्रारीत म्हटले आहे.त्यामुळेच वनविभागाचे वन्य प्राण्यांकडे दुर्लक्ष होत असल्याचे शेतकऱ्यांचे  म्हणणे आहे. वनरक्षक व वनकर्मचारी योग्य सेवा देत नसल्याने वर्षभराचे पिकाचे नुकसान होत आहे. त्यामुळे वनविभागाने या वन्य प्राण्यांचा बंदोबस्त करावा अशी मागणी पिंपळगाव (निपाणी), माळेगाव व लोहोगाव येथील शेतकऱ्यांनी केली आहे. अन्यथा तीव्र आंदोलनाचा इशारा शेतकऱ्यांनी दिला.


Comments

Popular posts from this blog

लाडली बहन योजना के कारण नहीं मिल रहे है मजदूर !

घरोघरी होणार वाघाट्याची भाजी.

ग्रामीण भागात कापूस वेचणीला सुरुवात